पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर मर्यादा; इंधन पुरवठ्यासाठी कंपन्यांच्या ‘फ्युएलेंट व सेल्स ऑफिसर्स’ची नियुक्ती


*​रत्नागिरी, दि. १८ :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १२ जून २०२६ च्या आदेशान्वये राज्यात पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर मर्यादा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व संस्थात्मक, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी किरकोळ विक्री केंद्रांमधून (रिटेल पंपांवरून) पेट्रोल व डिझेलची खरेदी करू नये. अशा ग्राहकांनी केवळ घाऊक ग्राहकांसाठी (Bulk Consumers) असलेल्या पंपांवरूनच इंधन खरेदी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
​शासनाच्या १६ जून २०२६ च्या पत्राद्वारे ‘बल्क हाय स्पीड डिझेल’ ग्राहकांना इंधन पुरवठा करणाऱ्या विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘फ्युएलेंट व सेल्स ऑफिसर्स’ची नियुक्ती करून त्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आली आहेत.
बीपीसीएल कंपनीचे अरविंथा कुमार, मो. नंबर. ९५००४७०१९८, ई मेल आयडी : aravinthakumare@bharatpetroleum.in आयओसीएल कंपनीचे शगुन रेड्डी, मो.नंबर.९८३३८१३३१० ई मेल आयडी: ShettySP@indianoil.in एचपीसीएल कंपनीचे भूषण एकनाथ चौधर मो. नंबर ९५९४८२०७५४, ई मेल आयडी: bhushan.chaudhari@hpcl.in, बल्क पर्चेसर (मोठी खरेदी असणारे ग्राहक) यांनी परस्पर संबंधितांशी संपर्क करुन आवश्यक ते इंधन प्राप्त करुन घ्यावे. कोणत्याही कंझ्युमर/रिटेल पंपावरुन असे इंधन प्राप्त करुन घेता येणार नाही, असे प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button