ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रारंभ

नोंदणीकृत रुग्णांच्या शस्त्रक्रियांना सुरुवात

रत्नागिरी :

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्कमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नोंदणी केलेल्या रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांनाही प्रारंभ करण्यात आला असून गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार नेत्रोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम ठरत आहे.

या सामाजिक उपक्रमासाठी इन्फिगोचे संचालक श्रीधर ठाकूर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल निलेशजी राणे मित्र मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यादीमध्ये नोंदणीकृत रुग्णांच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे करण्यात येत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी खासदार श्री. नारायण राणे यांचे खासगी सचिव योगेश मगदूम, शोएब खान, पिंट्या देसाई, शैलेश बेर्डे, अक्षय चाळके, अभी पिलनकर, ओमकार आग्रे, निखिल शेट्ये, नरेंद्र बनसोडे, सोहम पिलनकर, संदीप नार्वेकर, प्रणव सुर्वे, राजेश झगडे, विनय कुंभार, शिवाजी कारेकर, अभि कारेकर यांच्यासह मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे नागरिकांकडून स्वागत होत असून, आगामी काळातही अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button