दिल्याभूल जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींची खैर नाही


सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी आपला मोर्चा टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या कंपनी आणि सेलिब्रिटींकडे वळवला आहे.
चुकीच्या जाहिरात दाखवून ग्राहकांना उत्पादन खेरदी करण्यास भाग पाडले जाते. मात्र, यापुढे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

तुकाराम मुंढे यांनी पदभार हाती घेताच सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने धाडी टाकण्याचे व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याचे कडक निर्देश दिले. या आदेशानंतर यंत्रणेने कमालीची तत्परता दाखवत आतापर्यंत २८ दुकाने सील करण्यात आली असून ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता, त्यांनी टीव्ही किंवा वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई करण्याचा बडगा उगरला आहे.

दिल्याभूल जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींची खैर नाही

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, मोठमोठी आश्वासने आणि ब्रँडचे फायदे दाखवत कंपन्यांकडून अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडून ग्राहक ती उत्पादने खरेदी करतात. मात्र, आता अशा फसव्या जाहिराती अन्न व औषध प्रशासनाकडून खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रक्रियेत केवळ उत्पादन तयार करणारे उत्पादकच नाही, तर ग्राहकांपर्यंत ती जाहिरात पोहोचवणारे जाहिरातदार आणि उत्पादनाचा प्रचार करणारे सेलिब्रिटी देखील जबाबदार असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button