
तर इराणचं अस्तित्वच मिटवू’, ट्रम्प यांची उघड धमकी, 24 तासात 2 भीषण हल्ले, पुन्हा युद्ध पेटलं
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता करार करण्यात येत आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी संबंधित शांतता करारावर सही करून त्याला युद्धविरामाची घोषणा देखील केली होती.पण इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून युद्धाला तोंड फुटलं आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिकन हवाई दलाने ‘होर्मुजची सामुद्रध्रुनी’ आणि आसपासच्या इराणी सैन्य तळांना लक्ष्य केलं आहे. इराणमधील सिरिक भागात प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, इराणी प्रसारमाध्यमांनीही या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणने पनामाचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला केला होता. इराणच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील युद्धविराम कराराचे उल्लंघन झाले. याच चिथावणीखोर कारवाईला चोख उत्तर म्हणून अमेरिकेने होर्मुज जवळील इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इराणचे क्षेपणास्त्र साठे, ड्रोन केंद्रे आणि किनारपट्टीवरील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे.या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक पोस्ट लिहीत इराणला थेट इशारा दिला आहे. “अमेरिकन विमानांनी नुकतेच इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठ्यांवर तसेच किनारपट्टीवरील रडार साइट्सवर हल्ले केले आहेत, कारण त्यांनी पुन्हा एकदा युद्धविराम कराराचे उल्लंघन केले आहे. कदाचित अशी वेळ येईल जेव्हा आम्हाला संयम ठेवणं कठीण होईल. आम्हाला लष्करी ताकदीचा पूर्ण वापर करावा लागेल. जर असं घडलं, तर इराणचं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही!”




