ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाचे एन सी एम सी कार्ड काढण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून सुविधा


एस टी महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यातील सवलत मिळण्यासाठी ₹१९९/- भरून एन सी एम सी कार्ड असणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड्स वितरण करण्यासाठी मी. इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजिस्ट या कंपनीची नेमणूक एस टी महामंडळाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एस टी डेपो मध्ये न जाता ही कार्डस सुलभरित्या मिळण्यासाठी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी संघाच्या शिवाजी नगर येथील कार्यालयात कॅम्प आयोजित केला आहे. त्यावेळी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी श्री डी डी तराळे हे सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत कार्डची नोंदणी करतील. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एन सी एम सी कार्ड काढावयाचे आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा.त्यानी येताना आपले आधार कार्ड आणि मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कॅम्पचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संघाच्या वतीने अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button