World Urban Forum 2026 साठी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना अधिकृत आमंत्रण


रत्नागिरीतील अभ्यासू व्यक्तिमत्व व रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना मोठा सन्मान मिळाला आहे संयुक्त राष्ट्रांचे मानव वस्ती कार्यक्रम (UN-Habitat) यांच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातून अझरबैजान या देशच्या राजधानीत होणाऱ्या जागतिक शहर विकास परिषद २०२६ (World Urban Forum 2026) साठी अधिकृत आमंत्रण पत्र प्राप्त! झाले आहे

शहराच्या भविष्यासाठी ₹१८३० कोटींची तरतूद आणि व्हिजन प्लान मंजूर करून देणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे

दरम्यान, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सध्याच्या इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीचा संदर्भ देत, अझरबैजानची राजधानी बाकू ही तेहरानपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने आणि इतर अस्थिर वातावरण असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळण्याचा निर्णय घेतला असून, ते या जागतिक परिषदेत ऑनलाईन माध्यमातून हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button