सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरुअंतिम मुदत 20 जून


रत्नागिरी, दि. 12 ():- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचे अधिपत्याखालील चिपळूण येथील सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतीगृह मध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, प्रवेश पुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २० जून असून सर्व युद्ध विधवा / इतर माजी सैनिक विधवा / माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी यांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
चिपळूण येथील सैनिकी मुलांचे व मुलींच्या वसतिगृहमध्ये प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. शिल्लक राहीलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील. वसतिगृहासाठी प्रवेश फी प्रति महिना सेवारत असलेल्या सैनिकांच्या वर्गातून अधिका-यांच्या पाल्यांना 3 हजार 500 रुपये, जेसीओच्या पाल्यांना 3 हजार रुपये तर शिपाई किंवा एनसीओ यांच्या पाल्यांसाठी 2 हजार 800 रुपये असेल. माजी सैनिकांच्या वर्गातून अधिकाऱ्यांच्या पाल्यांना रुपये 3 हजार रुपये, जेसीओ च्या पाल्यांना 2 हजार 800 रुपये तर शिपाई किंवा एनसीओ यांच्या पाल्यांना 2 हजार 500 रुपये फी आहे. युध्द विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांना वसतिगृहात नि:शुल्क प्रवेश असणार आहे. सामान्य विद्यार्थ्यांना 3 हजार 500 रुपये फी आहे. प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम 1 हजार रुपये आकारण्यात येईल. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यातआलेले आहेत.
वसतिगृह प्रवेशासाठी प्राधान्यक्रमाने युद्ध विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये त्यानंतर अनुक्रमे पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये.), बी.एड. / डी. एड., पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे), बारावी, अकरावी व दहावी प्रमाणे (गुणवत्ता यादीप्रमाणे), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असलेस सिव्हिलियन पाल्य (मा. संचालकांच्या परवानगीने) याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक योगेश बने (मो. नं. ९८६७०६२०१९) व मुलींचे वसतिगृह साठी चौकशी करण्यासाठी वसतिगृह अधिक्षिका श्रीमती. सविता गायकवाड (मो. नं. ८३९०६७५९०२) यांच्याशी संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button