
सीएनजीची टंचाई, गॅसपंपावर होतेय ग्राहकांच्यात बाचाबाची
चिपळूण येथे तुटवडा जाणवत असलेल्या सीएनजीवरुन मंगळवारी दुपारी महामार्गावरील महानगर गॅ स पंपावर बाचाबाचीचा प्रकार घडला. खासगी वाहन चालकांनी एसटी बसनाही सीएनजी न देण्याची मागणी केल्याने वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली. यामुळे आगाराचे वेळापत्रक बिघडल्याने काही बस अर्धा तास उशिराने धावल्या.
सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने साहजिकच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पेट्रोल व सीएनजीची मागणीही वाढली असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. यामुळे वाहन चालकांना रांगांचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




