
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात कारवाई
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात शुक्रवारी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला. अतिक्रमण हटवली गेल्यामुळे महामार्ग परिसर मोकळा झाला असून वाहतुकीस दिलासा मिळाला आहे.
लांजा शहर महामार्गालगत बाजारपेठेत असलेल्या व्यावसायिकांना यापूर्वी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यास सांगितले गेले होते. त्यानुसार काहींनी स्वखर्चाने अतिक्रमणे हटवली तर उर्वरित अतिक्रमणांवर नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई केली होती. महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पादचारी व वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली




