जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खावडी संघ विजेता

राजापूर : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. त्याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर भाजपातर्फे राजापूर तालुका असोसिएशन व जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे विजेतेपद खावडी संघाने (ता. लांजा) पटकाविले, तर देवधे संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते. समालोचन संदीप तेरवणकर यांनी केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या खावडी संघाला रोख रक्कम १५ हजार रुपये व चषक, तर द्वितीय क्रमांक देवधे संघाला रोख रुपये १० हजार व चषक भाजपा जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजीत गुरव यांच्या हस्ते
देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा शीतल पटेल, महिला जिल्हा सरचिटणीस श्रृती ताम्हणकर, पूर्व मंडल तालुकाध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, नगरसेविका सुयोगा जठार, अनिल करगुटकर, माजी अध्यक्ष सुरेश गुरव, सरचिटणीस अमोल सिनकर, भाई मणचेकर, रेणूका गुंड्ये, शीतल रहाटे, स्नेहा रहाटे, दीपक बावकर, विवेक गुरव, राजेंद्र गुरव, प्रसन्न देवस्थळी, राजापूर तायक्वाँदो प्रमुख प्रशिक्षक मुकेश नाचरे, सोनाली केळकर, सुनील पटेल, अजय डंबे, संतोष धुरत, मेघनाथ गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई पुरुषोत्तम कोतवडेकर, उत्कृष्ट पकड आदित्य कोतवडेकर, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू तेजस गोंधळी यांची निवड करण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या शिस्तबद्ध स्पर्धेचे सर्वस्वी नियोजन आशिया वेट लिफ्टर प्रतीक गुरव व राजू जोगळे यांनी केले होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीलेश सावंत, आर्यन जड्यार, राज जड्यार, विश्वनाथ परवडीसह भाजप कार्यर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन राजू जोगळे, तर आभार संदीप तेरवणकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button