
राजापूर तालुक्यातील काेंब्ये-आडिवरेतील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू
राजापूर तालुक्यातील काेंब्ये-आडीवरे येथील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जयवंत विश्वनाथ नार्वेकर (70, रा. काेंब्ये-आडिवरे ता. राजापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. नार्वेकर हे रविवारी सकाळी घराच्या परिसरात साफसाई करत हाेते. अचानक त्यांना विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी नाेंद पाेलिसात करण्यात आली आहे.www.konkantoday.com




