संगमेश्वर तालुक्यात रेशन धान्यात लाखोंचा काळाबाजार होत असल्याचा आरोप


संगमेश्वर तालुक्यात गोरगरिबांच्या हक्काच्या रेशन धान्य वितरणात काळाबाजार झाल्याचा आरोप तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांनी थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. स्वतः सह संबंधित रेशन दुकानदार आणि काही वरिष्ठ अधिकार्‍यांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे पुरवठा विभागासह त्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुका पुरवठा निरीक्षण कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील सहा महिन्यांपासून धान्य न उचलणार्‍या शिधापत्रिकांचे शासनाच्या नियमांनुसार ऑनलाइन हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील पाच रेशन दुकानांची तपासणी केली असता सात क्विंटल इतकी धान्याची तूट आढळून आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button