रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका बँक खात्याचा वापर करून देशभरातील ५२ सायबर गुन्हे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड


रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील एका बँक खात्याचा वापर करून देशभरातील ५२ सायबर गुन्हे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे यामुळे पुढे आले आहे.
शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यानी याला दुजोरा दिला. नॅशनल सायबर क्राईम रिपोटिंग पोर्टलवर देशातून विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्रच्या शिवाजीनगर ६०५५११५८६२९ हे आले. १ जानेवारी २०२६ पासून ते आजपर्यंत सायबर गुन्हेगारांनी देशपातळीवर नागरिकांची फसवणूक केली आहे. वैभव शंकर शिवलकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खातेधारक आणि त्याच्या इतर साथीदारांनी संगनमत केले आहे. यातून ५२ विविध सायबर तक्रारींमधील नागरिकांना आमिषे दाखवत दिशाभूल करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४१९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या बँक खात्याचा मूळ धारक कोण आहे आणि या रॅकेटमध्ये नेमके कोण कोण सामील आहे, याचा कसून तपास करत आहेत. सायबर गुन्हेगारांनी आपल्या फसवणुकीसाठी रत्नागिरीतील बँक खात्याचा वापर केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button