कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा! विनाआरक्षित ४ विशेष गाड्या शनिवारपासून सेवेत; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई ते सावंतवाडीदरम्यान चार विनाआरक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत धावणार असून, नियमित गाड्यांमधील वाढती गर्दी आणि आरक्षण न मिळालेल्या चाकरमान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष रेल्वे गाडी वेळापत्रक कसं असेल ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोडदरम्यान धावणारी गाडी क्रमांक ०१००९ अनारक्षित विशेष गाडी १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी (०१०१०) अनारक्षित विशेष गाडी १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोडहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या चार फेऱ्यांमुळे गणेशोत्सवाच्या आधी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना विशेषतः मोठा दिलासा मिळणार आहे.

या गाड्या १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत धावणार असून, नियमित गाड्यांमधील वाढती गर्दी आणि आरक्षण न मिळालेल्या चाकरमान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या स्थानकांवर थांबणार?

गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड आदी ठिकाणी थांबे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button