
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील मुख्य विहिरीचे पाणी दूषित
गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामस्थांची तहान भागवणार्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील मुख्य विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. परिसरातील काही ग्रामस्थांनी पावसाचे पाणी वाहून जाणारे पूर्वपार प्रवाह बंद कल्याने दूषित पाणी विहिरीत जात असल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे शेकडो ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर बनला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर धडक देत संबधितांची बांधकामे तोडून प्रवाह मोकळे करण्याची मागणी केली आहे.




