दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरहूनच सोडण्याच्या मागणीबाबत रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता


कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्वाची आणि सर्वसामान्यांची हक्काची वाहिनी समजली जाणारी ’दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ पुन्हा एकदा दादर स्थानकावरूनच पूर्ववत सुरू करावी, या मागणीने आता चांगलाच जोर धरला आहे. सध्या ही गाडी दिवा स्थानकापर्यंत मर्यादित ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत असून मुंबईत जाणार्‍या कोकणवासीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत असून खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक पाऊल उचलले आहे.
काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी नवी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणवासीयांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे परिचालन पुन्हा दादरपासूनच करण्यात यावे, जेणेकरून नोकरी-धंदा आणि वैद्यकीय कारणास्तव मुंबईत ये-जा करणार्‍या रत्नागिरीकरांची गैरसोय दूर होईल, असा आग्रह त्यांनी धरला होता. या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची दखल घेत् आता रेल्वे मंत्र्यांनी त्यांजा अधिकृत पत्राद्वारे उत्तर दिले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button