कोसळलेल्या फगरवठारची संरक्षक भिंत उभारणी वेगात, मालकाची स्वखर्चाने भिंत बांधून देण्याची तयारी


रत्नागिरी शहरातील परिसरात मधला फगरवठार परिसरात अतिवृष्टीमुळे कोसळलेली संरक्षण भिंत पुन्हा उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. नगरपरिषदेने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर संबंधित जागा मालकाने स्वतःच्या खर्चाने ही भिंत बांधून देण्याची तयारी दर्शवली असून, प्रशासकीय परवानगीनंतर या पुनर्बाधणीच्या कामाला मोठी गती आली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात मधला फगरवतार येथील रस्त्यालगतची भलीमोठी संरक्षण भिंत अचानक कोसळली होती. या दुर्घटनेचे कारण भिंतीच्या पायाजवळ करण्यात अनधिकृत सपाटीकरण आणि खोदाई हे होते. पाया उघडा पडल्याने जमीन खचली आणि नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही भिंत कोसळती होती. यामुळे परिसरातील वाहतूक आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सार्वजनिक मालमतेचे नुकसान आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे पाहून रत्नागिरी नगरपरिषदेने या प्रकरणी अत्यंत कड़क भूमिका घेतली होती अनधिकृत खोदाई करणाया निष्काळजी जागा मालकावर बेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.
नगरपरिषदेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर जागा मालकाने तत्काळ नमती भूमिका घेतली. त्यांनी नगर परिषदेला रितसर पत्र देवून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून कोसळलेली संरक्षण भिंत स्वखर्चाने नव्याने बांधून देतो अशी विनंती केली. नगरपरिषदेनेही सकारात्मक प्रतिसाद देत या पुनर्बांधणीला मंजुरी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button