भेसळयुक्त अन्न पोटात गेलंय? ‘हे’ आहेत शरीरावर होणारे घातक दुष्परिणाम!

Food Adulteration Marathi Health : रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमधील भेसळ ही एक मोठी अनारोग्याची समस्या ठरली आहे. दूध, पनीर, मसाले, तूप आणि चहा पावडर यांसारख्या वस्तूंमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे पचनसंस्थेचे विकार, यकृत, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचे गंभीर आजार उद्भवू शकतात, म्हणूनच ही भेसळ ओळखणे आणि वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे आहे.

पनीरमध्ये स्टार्च

भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दूध किंवा खव्यात सिंथेटिक दूध मिसळल्यास मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो, तर आईस्क्रीममध्ये स्टार्च मिसळल्याने पोटदुखी व पचनाचे विकार होऊ शकतात. पनीरमध्ये स्टार्च किंवा डिटर्जंटची भेसळ केल्यास पचनाचे विकार होण्याची शक्यता असते. तांदळात प्लास्टिकमिश्रित तांदूळ आढळल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. डाळींमध्ये मेटॅनिल यलो या कृत्रिम रंगाची भेसळ झाल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

कॉफीमध्ये चिकोरी

फळांमध्ये कॅल्शियम कार्बाइडचा वापर केल्यास डोकेदुखी, चक्कर आणि मज्जासंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतात. चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर किंवा कृत्रिम रंग मिसळल्यास यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कॉफीमध्ये चिकोरी किंवा भुसा मिसळल्यास पचनाचे विकार होऊ शकतात. सुपारी आणि तंबाखूमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. मिठात पांढरी माती किंवा बेरियम कार्बोनेट मिसळल्यास मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

लोण्यामध्ये वनस्पती तूप

साखरेमध्ये खडूची पूड मिसळल्यास पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. काकवीमध्ये पावडरचा वापर केल्यास विषबाधा होण्याची शक्यता आहे. धणेपूडमध्ये लाकडाचा भुसा मिसळल्यास निकृष्ट दर्जा आणि पचनाचे विकार होऊ शकतात. मिरचीपूडमध्ये विटांची पूड किंवा सूडान डाय मिसळल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच तूप किंवा लोण्यामध्ये वनस्पती तूप किंवा अॅल्युमिनियम मिसळल्यास हृदयविकार आणि मज्जासंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता तक्त्यात नमूद केली आहे.

अशा विविध प्रकारच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांमुळे शरीराचं मोठं नुकसान होतं, हे खरंच. पण त्यासाठीच हे भेसळयुक्त पदार्थ कसे ओळखावेत याचीही माहिती करून घेणं करून खूप आवश्यक असतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button