साखरोलीत ६१ वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू

दारूच्या नशेत गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती; पोलिसांकडून तपास सुरू

खेड : तालुक्यातील साखरोली गावातील भुवडवाडी येथे ६१ वर्षीय संतोष रामजी साटले यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष साटले यांनी दारूच्या नशेत घरातील लाकडी भालाला नायलॉनच्या जाड दोरीने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांना उपचारासाठी कळंबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button