भेलसईत दुचाकी अपघातप्रकरणी मयत दुचाकीस्वारावर गुन्हा

पुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळली; सहकारी जखमी, दुचाकीचे नुकसान

खेड : तालुक्यातील धामणंद-पंधरागाव विभागातील भेलसई गावात चौथाई पुलाजवळील वळणावर दुचाकीचा अपघात होऊन सहकारी जखमी झाल्याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीस्वार रुपेश सुरेश घाडवे याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता रुपेश घाडवे हा एमएच ४३ सीएफ २१७७ क्रमांकाची दुचाकी घेऊन शेल्डी ते भेलसई मार्गावरून जात होता. भेलसई चौथाई पुलाजवळील वळणावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळली.
या अपघातात रुपेश घाडवे याचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सर्वेश शिवराम धाडवे याला दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. दुचाकी हयगयीने, बेदरकारपणे आणि वेगात चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी दर्शन अनंत धाडवे, रा. भेलसई, ता. खेड, जि. रत्नागिरी यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे मयत रुपेश घाडवे यांचे चुलत भाऊ आहेत.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १२८/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button