डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाऐवजी जुन्या नावाचा फलक.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान शहरातील बहादूरशेख नाका येथील नामांतर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा उल्लेख न करता जुन्याच ’बहादूरशेख नाका’ नावाचा फलक राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लावण्यात आल्याने परिसरातील आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. याची दखल माजी नगरसेवक अरूण भोजने व सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी घेत फलक बदलण्याच्या सुचना दिल्या.
यावर कार्यकारी अभियंता यांनी या बाबत आम्हाला कल्पना नव्हती. संबंधित फलक तात्काळ बदलण्यात येतील,’ असे आश्वासन दिले, तसेच नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामफलक लवकरच लावण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button