हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात जनआरोग्य समितीची पहिली सभा संपन्न


राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. २० मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जनआरोग्य समिती स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांनुसार समर्थ नगर, राजापूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे जनआरोग्य समितीची स्थापना करण्यात आली आहे.
आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, नागरिक व रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रभावी निराकरण करणे, विविध संस्था व विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे, तसेच आरोग्यविषयक उपक्रम व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्य संस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीची पहिली सभा दि. २८ जुलै २०२६ रोजी समर्थ नगर, राजापूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद राजापूरच्या नगरसेविका तथा जनआरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ. सुयोगा जठार या होत्या.
यावेळी सह-अध्यक्ष डॉ. बालाजी लोकरे (तालुका आरोग्य अधिकारी, राजापूर), सदस्य सचिव डॉ. राहुल रेगर (वैद्यकीय अधिकारी, आपला दवाखाना, राजापूर), नगरसेवक दिलीप चव्हाण, नगर परिषद आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुलतान ठाकूर, नगरसेविका नेहा तानवडे तसेच समितीचे इतर पदसिद्ध सदस्य उपस्थित होते.
सभेत जनआरोग्य समितीची उद्दिष्टे, रचना, भूमिका व जबाबदाऱ्या, समितीची कार्यपद्धती, निधीचे व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समितीचे कामकाज प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button