जि. प. ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण


रत्नागिरी जिल्हा परिषदे अंतर्गत विविध विभागांतील कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत प्रशासकीय आणि विनंती बदल्यांचा मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. या बदल्यांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाला नवीन ऊर्जा मिळणार असून, रिक्त पदांच्या स्थितीतही ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी या प्रक्रियेतून घेण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने रिक्त पदांच्या आव्हानावर एक सुवर्णमध्य काढत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागात मंजूर ४८३ पदांपैकी २५८ पदे रिक्त आहेत. या. रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये, म्हणून प्रशासनाने उपलब्ध मनुष्यबळाचे जिल्ह्यातील ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना समसमान पद्धतीने वाटप केले आहे. यामुळे प्रत्येक केंद्रावर किमान कर्मचारी उपलब्ध राहतील, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
शिक्षक आणि ग्रामसेवकांना ’जनगणने चा आधार दरवर्षी बदली प्रक्रियेत केंद्रस्थानी असणारे शिक्षक आणि ग्रामसेवक यांना यावर्षी मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात जनगणनेचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू असल्याने, राज्य शासनाने या दोन्ही संवर्गाच्या बदल्या न करण्याचे आदेश दिले होते. परिणामी, शिक्षक व ग्रामसेवक यावर्षी बदली प्रक्रियेतून पूर्णपणे बचावले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button