चिपळूणच्या भाजी मंडईजवळ कार शिवनदीत कोसळली; चालकाची थोडक्यात बचावला


चिपळूण शहरातील भाजी मंडई परिसरात रविवारी एक कार रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटल्याने थेट शिवनदीत कोसळली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक सुखरूप बचावला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतुकीचे नियोजन केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने नदीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. या गाडीवर लर्निंग चिटकवलेले होते त्यामुळे चालक नवशिका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button