
एसटी महामंडळाच्या ’छावा राईड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग
महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सत्रात मोठा बदल घडवून आणणार्या ’छावा राईड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या एकात्मिक वाहतूक ऍपच्या विकासासाठी, संचालनासाठी आणि देखभालीसाठी अधिकृत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या ऍपमुळे भविष्यात एस्टी बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस अशा विविध वाहतूक सेवांचा लाभ प्रवाशांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे.
’छावा राईड’ हे केवळ कॅब बुकिंगसाठीचे ऍप नसून राज्यातील विविध सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. सध्या वेगवेगळ्या वाहतूक सेवांसाठी प्रवाशांना स्वतंत्र ऍपचा वापर करावा लागतो. मात्र, ’छावा राईड’च्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या प्रवारण्याठी उपलब्ध असलेले विविध पर्याय एकाच ठिकाणी पाहाता येतील आणि त्यानुसार वाहतूक सेवा निवडता येणार आहे.




