डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त


पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या डी-मार्टच्या गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. मावळमधील आंबी गावात असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या (डी-मार्ट) सुविधेची तपासणी करताना अधिकाऱ्यांनी तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त केले.जप्त करण्यात आलेल्या तेलाची एकूण किंमत ५० लाख २७ हजार ८९३ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. खाद्यतेलाचा दर्जा निकृष्ट असण्याची तसेच उत्पादनांवर दिशाभूल करणारी लेबले लावण्यात आल्याची शंका असल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही.

मावळमधील डी-मार्टच्या साठवण केंद्राची तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील आंबी गावातील शेड क्रमांक १, गट क्रमांक ११३ येथे ही तपासणी केली. या ठिकाणी साठवून ठेवलेल्या विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या साठ्याची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तेलाचा दर्जा आणि उत्पादनांवरील लेबलिंग याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित साठा जप्त करण्याची कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button