राज्यभर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रमाचे आयोजन:- ना. उदय सामंत


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमाबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे
३ ऑक्टोबर – मुंबई विद्यापीठ,
४ ऑक्टोबर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
५ ऑक्टोबर – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
६ ऑक्टोबर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
७ ऑक्टोबर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
८ ऑक्टोबर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
९ ऑक्टोबर – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
१० ऑक्टोबर – मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर
११ ऑक्टोबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
१२ ऑक्टोबर – कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
१३ ऑक्टोबर – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
१४ ऑक्टोबर – संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
१५ ऑक्टोबर – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि संबंधित महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, मराठी भाषा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलानाची’

ऐतिहासिक अशा १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ या उपक्रमाअंतर्गत छोटेखानी ९९ संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या-ज्या राज्यांमध्ये आणि विविध भागांमध्ये अ.भा.मराठी साहित्य संमेलने आय़ोजित केली होती, त्याच ठिकाणी ही ९९ संमेलने आयोजित कऱण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरु झालेली ही संमेलने १५ जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहेत. या संमेलनांमध्ये विविध साहित्यिक उपक्रम आणि ग्रंथप्रदर्शनांचं आयोजन करण्यात येणार आहे.
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button