
बालिकेशी गैरकृत्य, प्रौढावर गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील एका बालिकेशी गैरकृत्य केल्याप्रकरणी किशोर भगवानजी पटेल (५०, मूळ रा. देवपूर, जि. भुज, गुजरात) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ७ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी व तिचा भाऊ हे दोघे एका हॉटेलमध्ये वडापाव आणण्यासाठी गेले होते. किशोर पटेल याने मुलाला पाणी आणण्यासाठी पाठवून मुलीसोबत हॉटेलच्या किचनमध्ये अश्लील वर्तन केले. याप्रकरणी त्याच्यावर ’पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या करीत आहेत.




