चिपळूण येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय अखेर रत्नागिरीत.


गेल्या अनेक दिवसांपासून स्थलांतरावरून चर्चेत असलेले चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय अखेर सोमवारी रत्नागिरी येथे स्थलांतरित करण्यात आले. गेल्या ४० वर्षाहून अधिककाळ जिल्ह्याचे असलेले हे मुख्यालय अखेर रत्नागिरीतील तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीत हलवण्यात आले आहे. चिपळूणमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेले हे कार्यालय हलवण्याच्या पशुसंवर्धन विभाग कार्यालय जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन निर्णयाबाबत स्थानिक पातळीवर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्थलांतराबाबत वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यानंतर याबाबतची कार्यवाही गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली होती. त्यादृष्टीने सोमवारी आवश्यक कागदपत्रे, अभिलेख व कार्यालयीन साहित्य हलवण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली मंगळवारपासून प्रत्यक्ष कामकाज रत्नागिरीतून सुरू झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button