कोकण रेल्वे मार्गावरील दिवा-चिपळूण मेमूचा संगमेश्‍वरपर्यंत विस्तार करा, जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांची मागणी.


दिवा येथून खास कोकणवासीय नागरिकांसाठी गणपती तसेच अन्य सणासुदीच्या काळात चालवण्यात येणार्‍या दिवा-चिपळूण मेमू स्पेशल गाडीचा विस्तार करून ही ट्रेन दिवा ते संगमेश्वर रोड अशी चालवावी, अशी लक्षवेधी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, बेलापूर भवन, सीबीडी यांना सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिवा-चिपळूण मेमूचा विस्तार दिवा-संगमेश्वर असा केल्यास कामथे, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, देवरुख परिसरातील मुंबईस्थित कोकणवासीयांना मोठा लाभ होईल. गणपती आणि शिमगोत्सव काळात मुंबईहून गावाकडे येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. अशावेळी प्रवाशांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button