कोकण रेल्वे प्रवाशांचा पावसाळ्यात प्रवास सुखरूप व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर


कोकण रेल्वे मार्ग गुंतागुंतीच्या भूभागातून जात असल्याने अनेक टप्प्यावर मुसळधार पावसाची दाट शक्यता असते. पावसाळ्यातील रेल्वेच्या कामकाजातील सुरक्षितता अन् विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह मार्गाची सखोल पाहणी केली जात आहे. पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून अभियांत्रिकी कामे सुरू आहेत.
या कामांमध्ये कटिंग खाली करणे, बीएलटी दुरूस्ती, ट्रॅक उचलणे, डीप स्क्रीर्निंग, थ्रू ट्रॅकचे नूतनीकरण, पीक्यूआरएस देखभाल आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी काही विशिष्ट विभागांमध्ये गाड्यांचा वेग कमी केला जात आहे. यामुळे मार्गावरून धावणार्‍या गाड्यांना थांबा देण्यात येत असल्याने किरकोळ विलंब होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कोकण रेल्वेगाड्यांचे कामकाज प्रभावीपणे मजबूत व्यवस्थापित करण्यासाठी मजबूत देखरेख प्रणाली आणि समन्वय नियमावली वापरण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button