
कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला झुरळासमान लेखल्यानंतर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने अवघ्या पाच दिवसांत सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेतआज (21 मे) गुरुवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत, इन्स्टाग्रामवर हा आकडा 10.5 मिलियनआणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत पोहोचला होता. इन्स्टाग्रामवर भाजपचे 8.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे 13.3 मिलियन आहेत. जितक्या वेगाने कॉकरोच जनता पार्टीला प्रतिसाद मिळत आहे तो पाहता तो देशातील अशांत तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा रंगली आहे.अभिजीतने पक्षाचा लोगोही प्रसिद्ध केला आहे. ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी’ हे त्याचे घोषवाक्य आहे. या पक्षाने अवघ्या एका दिवसात 45 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीशांनी आपण असे काहीही म्हटले नसल्याचे स्पष्ट केले.




