आता काऊंटडाऊन सुरू! ‘फाईली लवकरच संपवा’, पंतप्रधान मोदींची कॅबिनेट बैठक संपली


तप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जवळफास ४.३० तास ही बैठक चालली होती. या बैठकीतमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्री आणि विभागांना तातडीने उरलेली कामं लवकरात लवकर संपवून टाका, कामाला गती द्या, अशी सूचना दिली.

त्यामुळे लवकरच आता मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची एक मोठी आणि महत्त्वाची बैठक घेतली. ही बैठक सुमारे साडेचार तास चालली. या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना स्पष्ट निर्देशच देऊन टाकली आहे. ही बैठक संध्याकाळी 5 वाजता सुरू झाली आणि उशिरा रात्रीपर्यंत चालली. यात सर्व प्रमुख मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता.

कामात सुधारणा करा

मोदींनी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला आणि जिथे कामात उशीर होत आहे, तिथे तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींनी सांगितलं की, सरकारच्या योजना वेळेत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आता कुठेही हलगर्जीपणा चालणार नाही आणि प्रत्येक मंत्र्याने आपल्या विभागाच्या कामावर नियमित लक्ष ठेवावे लागेल.

9 विभागांचे प्रेझेटेशन

पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. कृषी, वन, कामगार, रस्ते वाहतूक, कॉर्पोरेट, परराष्ट्र, वाणिज्य, ऊर्जा हे विभाग होते. “फायली लवकर पूर्ण कर, फालतू चकरा टाळा. कमी वेळेत जास्त काम झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सोपेपणा आणा. सुधारणा महत्त्वाच्या आहेत. तसंच, 2047 मध्ये विकसित भारत हे फक्त नारा नाही, तर आपली वचनबद्धता आहे. मागे वळून पाहण्याचा वेळ नाही. मोदींनी जनहित सर्वात महत्त्वाचे मानून काम करा, असं सांगितलं.

‘मागे वळून पाहू नका’

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना बजावलं की, “आता पुढे पाहण्याचा काळ आहे, मागे वळून काय झाले याकडे पाहू नका. आपली सरकार 2014 पासून सत्तेत आहे, पण आता 2026 आहे, म्हणून भविष्यात काय करता येईल हे पाहा. अनावश्यक वादात पडू नका आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. ही बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रती बॅरलच्यावर गेल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो कारण देश आपली सुमारे 85 टक्के तेलाची गरज आयातीवर भागवतो. तेलाच्या किंमती वाढल्याने देशात महागाई वाढू शकते. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमती, वाहतूक खर्च आणि रोजच्या वस्तूंवर होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button