
आंब्याच्या झाडावरुन पडलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
आंब्याच्या झाडावरुन पडलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश पांडुरंग जाधव (५२, डेरवण) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश जाधव हे शनिवारी आंबे काढण्यासाठी झाडावर चढले असताना त्यावरुन ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.www.konkantoday.com




