स्थानिक व्यवसायांना ऑनलाईन बाजारपेठेची संधी, अनबॉक्स युवर डिझायरचा पर्याय


स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांना ऑनलाईन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी एनजीओ क्विकबॉक्स आणि रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायरने नवा डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता स्थानिक प्रत्येक दुकानदाराला आपली उत्पादने सहजपणे ऑनलाईन विकता येणार आहेत. तसेच तसेच क्विकबॉक्सकडून वस्तू घरपोच केल्या जाणार आहेत.
सध्याच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी ऑनलाईन उपस्थिती अत्यंत महत्त्वाची बनली असून, ’क्विकबॉक्स’च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना आपली ओळख निर्माण करून अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर कोणतीही नोंदणी फी किंवा कमिशन आकारले जाणार नसून, व्यापार्‍यांना आपली उत्पादने जाहिरात करण्याचीही सुविधा मिळणार आहे.
या करिता शॉप ऍक्ट लायसन्स किंवा भाडेकरार, फूड लायसन्स (लागू असल्यास), पॅनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स किंवा रद्द केलेला धनादेश अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी हा प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी इच्छुक व्यावसायिकानी आगाशे एम्पायर, नाजण साळवी स्टॉप लिंक रोड रत्नागिरी, संपर्क -८८३०७७०१५४ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button