
राजापूर पंचायत समितीची मासिक सभा १७ रोजी
राजापूर : पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी ११ वाजता सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या किसान सभागृहात होणार आहे.
या सभेमध्ये संभाव्य पाणीटंचाईबाबत तसेच आगामी पावसाळा नजरेसमोर ठेवून करायची उपायोजना याबाबत व्यापक स्वरूपात चर्चा अपेक्षित असून, तालुक्यातील विविध विभागवार विकास कामांचा आढावाही घेतला जाणार आहे.
पंचायत समितीच्या मागील मासिक सभेत विलंबाने सभागृहात येणाऱ्या आणि गैरहजर राहणाऱ्या अधिकारी वर्गाला संतप्त सभापती, उपसभापती यांच्यासह सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. पुढील सभेला अशी दिरंगाई चालणार नसल्याचे देखील ठणकावून सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळी सर्व विभागाचे अधिकारी यांच्या वेळेवरील उपस्थितीकडे सभागृहाचे कटाक्षाने लक्ष असणार आहे.




