दापोली एसटी बसस्थानकाच्या आवारात बसखाली पाय आल्याने वृध्द महिला गंभीर जखमी


दापोलीः- दापोली एसटी बसस्थानकाच्या आवारात बसखाली पाय आल्याने सुमारे 60 वर्षीय वृध्द महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोळबांद्रे-बेजेवाडी ते दापोली अशी धावणारी एसटी बस क्र. (एमएच 20 डीएल 2127) दापोली बसस्थानकाच्या आवारात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. यावेळी फातिमा हमीद जोगीलकर (वय अंदाजे 60, रा. खेड) या महिलेचा बसच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली पाय आला. या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. घटना घडताच परिवहन महामंडळाचे अधिकारी मुनाफ राजापकर व अन्य कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत जखमी महिलेला तातडीने दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी मिरज येथे हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
फोटो डिपी 05-03 फातिमा हमीद जोगीलकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button