राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे एका शिक्षकानाचे महिलेवर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना


राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे एका शिक्षकानाचे महिलेवर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या या शिक्षकाने महिलेवर अशा प्रकारे अत्याचार केल्याचे उघड झाल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी त्या पिडीत महिलेच्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाटे पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्या नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकाराने या परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी पोलीसांनी माहिती दिली आहे. रामनाथ नारायण वाकडे असे या नराधम शिक्षकाचे नाव असून तो याच परिसरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या शिक्षकानेच अशा प्रकारचे विकृत कृत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासली गेली आहे.

पीडित महिला २० आणि २१ एप्रिल रोजी परिसरातील एका काजूच्या बागेत कुंपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करत होती. यावेळी आरोपी शिक्षक रामनाथ वाकडे याने महिलेला एकटे गाठले आणि तिच्यावर जबरदस्तीने पाशवी अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला जमिनीवर पाडून ‘याबाबत कोणाला काही सांगितलेस, तर तुझे काय करीन ते बघ,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली असे त्या महिलेने तक्रारीत नमुद केले आहे.

या प्रकरणी त्या पीडित महिलेने तात्काळ नाटे पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. त्या पिडीत महिलेले दिलेल्या तक्रारीनंतर नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेचे गांभीर्य आणि आरोपीचे पद पाहता पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवली व रात्रीच या नराधम शिक्षकाला त्याच्या परिसरातून ताब्यात घेत अटक केली.
या प्रकाराने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button