रत्नागिरी जिह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगार रखडले


 रत्नागिरी जिह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांचे पगार रखडले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शालार्थ प्रणाली आणि संच मान्यता २०२४-२५ च्या पदांमध्ये बदल दिसत असल्याने की काही अन्य तांत्रिक कारणामुळे, ऑनलाईन संच मान्यतेतीला त्रुटींमुळे शिक्षकांची पगार बिले फॉरवर्ड होत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत.
याच परिस्थितीला गेले चार महिने या शिक्षकांना तोंड द्यावे लागत आहे. या आधी ही बिले फॉरवर्ड केल्यावर शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक कोल्हापूर लॉगिनला बिले जात होती. त्याठिकाणी मंजूर झाल्यावर उशिराने शिक्षकांना पगार मिळत होता. यासाठी देखील शिक्षक वर्गाला फेर्‍या माराव्या लागत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button