
दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातील पणदेरीतील घरफोडीत रोकड, दागिने लांबवले
दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातील पणदेरी येथे बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व दागिने असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १६ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजल्यापासून १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दाभोळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता संतोष भेकरे (५६, रा. पणदेरी, ता. दापोली) यांच्या मालकीच्या घरात ही चोरी झाली अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट फोडून त्यामधील तिजोरी उघडण्यात आली. तिजोरीत ठेवलेली ३२ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम, तसेच ५ हजार रुपये किमतीची मोत्याची नथ असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.




