
रत्नागिरीत श्री गुरुदत्त निसर्ग उपचार केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील नाचणे रोडवरील अभ्युदय नगर येथे श्री गुरुदत्त निसर्ग उपचार केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक राजीव कीर, सौरभ मलुष्टे, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
चिंतामणी गार्डन, अभ्युदय नगर, नाचणे रोड येथे सुरू झालेल्या या केंद्रात औषधांचा वापर न करता केवळ नैसर्गिक जीवनशैलीद्वारे आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबिर झाले. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी या उपक्रमाला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले.
केंद्रात एक्युप्रेशर, मोक्सीबस्टन, हीटिंग मसाज, कास्स्थळी मसाज, फुल बॉडी मसाज, स्टीम बाथ, गुडघे दुखी, मानेचा गॅप, लपट थेरपी, मड थेरपी, बॉडी ॲनालिसिस चेकअप, योगा, न्यूरोथेरपी, मॅग्नेट थेरपी या उपचार पद्धती उपलब्ध असतील. तसेच वजन वाढविणे किंवा कमी करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने मार्गदर्शन केले जाईल.




