पोफळी येथील कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून २००५ मेगावॅट विक्रमी वीजनिर्मिती


पोफळी येथील कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून सध्या पूर्णक्षमतेने वीजनिर्मिती केली जात आहे. १९५६ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पातून शुक्रवारी (ता. १७) २ हजार ५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच सव्वा तासात ४९ मेगावॅट जादा वीजनिर्मिती करण्यात आली. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद महानिर्मिती कं पनीच्या महाव्यवस्थापकांनी घेत पोफळी वीज संकुलनातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.
कोयना प्रकल्पातून निर्माण होणारी वीज काही सेकंदामध्ये राज्याच्या ग्रीडमध्ये येते. त्यामुळे हा प्रकल्प केवळ मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी चालवला जातो. तापमान वाढल्यामुळे शुक्रवारी (ता. १७) राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढली होती. त्यावेळी सायंकाळी ६.४५ ते ७ वाजेपर्यंत प्रकल्पातून तब्बल २ हजार ५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. मागणीच्या काळात वीज उपलब्ध करून देण्यासाठी कोयना प्रकल्प सक्षम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
ही उल्लेखनीय कामगिरीच्या संपूर्ण टीमच्या उत्यूष्ट समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि समर्पणाचे द्योतक आहे. अशा प्रकारची कामगिरी जलविद्युत निर्मिती युनिटच्या विश्वासार्हतेला आणि उच्च कार्यक्षमतेला अधोरेखित करते तसेच उत्व मागणीच्या महत्त्वाच्या कालावधीत उत्पादनाचा उत्तम वापर करण्यासाठी संबंधित सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे है प्रतीक आहे. कोयना जलविद्युत निर्मिती केंद्र संकुलाच्या स्थापनेपासूनच्या ६५ वर्षांच्या इतिहासांत ही आतापर्यंतची सर्वाधिक लोडेबिलिटी नोंदविण्यात आली असून युनिट्सवरील लोडेबिलिटीचा एक अपवादात्मक विक्रम प्रस्थापित झाला आहे..www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button