
दापोली तालुक्यातील वळणे येथील हॉटेलमध्ये तरुण पर्यटकाची गळफासाने आत्महत्या.
दापोली तालुक्यातील वळणे येथील एका हॉटेलमध्ये पर्यटकाने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. श्रवण निनाद ठाकुर-देसाई (२३, डोंबिवली पूर्व) असे या पर्यटकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद निनाद विजय ठाकुर-देसाई (४९, डोंबिवली ईस्ट) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद ठाकुर-देसाई यांची पत्नी श्रवणला चहा पिण्याकरिता बोलावण्यासाठी गेल्या असता त्यांनी श्रवण याला बाथरुममध्ये टॉवेलने गळफास लावून घेतल्याचे पाहिले व जोराने आरडाओरड केली. निनाद ठाकुर-देसाई यांनी तेथील सर्वांच्या सहाय्याने श्रवणच्या गळ्यातील टॉवेल काढला. तसेच त्यांचे साडू विक्रांत यांनी हॉटेल रिसेप्शनला फोन करून श्रवण बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याला उपचाराची गरज आहे असे सांगितले.
हॉटेलच्या कर्मचार्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून श्रवण याला मृत घोषित केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड करीत आहेत.
www.konkantoday.com




