कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी-मडगाव साप्ताहिक १७ एप्रिलपासून धावणार


उन्हाळी सुट्टी हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल १७ एप्रिलपासून धावणार आहे. १२ जूनपर्यंत स्पेशलच्या फेर्‍या धावणार आहेत. ०१११९/०११२० क्रमांकाची एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी धावेल. एलटीटीहून रात्री १२.५५ वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथील सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी. पहाटे ३.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. २१ एलएचबी डब्यांच्या या स्पेशलला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावतंवाडी, थिविम, करमाळी स्थानकात थांबे आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button