
रेल्वे रुळावर आढळलेल्या मृताची ओळख पटली, मृत व्यक्ती रवींद्रनगर कुवारबावमधील
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे रूळावर आढळलेल्या मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. बंडू लक्ष्मण शिंदे (७६, रा. रवींद्रनगर कुवारबाव रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वंदे भारत ट्रेनच्या चालकाच्या एमआयडीसी येथे एक व्यक्ती ट्रेनला धडकल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता प्रौढ मृतावस्थेत आढळला होता. पोलीस तपासामध्ये हा मृतदेह बंडू शिंदे यांचा असल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com




