
अनंत गीतेंची कार कार्यकर्त्यांनी अडवली, काही काळ गोंधळाचे वातावरण
रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाल्यानंतर इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते त्यांच्या कारने मार्गस्थ होत असतानाच तटकरे समर्थकांनी त्यांची कार अडवल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. त्यांची कार कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर काढताना पोलिसांच्या गराड्यातून बाहेर काढताना पोलिसांची दमछाक झाली. अखेर दस्तुरखुद गीतेंनी कार्यकर्त्यांना नम्रतापूर्वक अभिवादन केल्यानंतर ते पुढील दिशेने मार्गस्थ झाले.मतमोजणीदरम्यान इंडिआ आघाडीचे उमेदवार अनंत गीते प्रत्येक फेरीदरम्यान आघाडीवर होते. मात्र त्यांची पिछाडी सुरू झाल्यानंतर गीते व तटकरे समर्थक आमने-सामने उभे ठाकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.www.konkantoday.com




