
आर्यन खेडेकरने जलतरणमध्ये रचला इतिहास
खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक येथील १५ वर्षीय जलतरणपटू आर्यन राजेश खेडेकर याने क्रीडा क्षेत्रात भारतासह महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. पश्चिम बंगालमधील जगप्रसिद्ध व जगातील सर्वात लांब खुल्या जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदवताना ८१ कि. मी. अंतर ११ तास ३४ मिनिटात पार करत त्याने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. या विक्रमाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आयोजित प्रतिष्ठित जलतरण स्पर्धेत भागिरथी नदीतील तब्बल ८१ किलोमीटरचे अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर अंतर आर्यनने ११ तास ३४ मिनिटांत पोहून पूर्ण करत सार्यांनाच अचंबित केले. ही खडतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो या स्पर्धेतील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे. सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेला आर्यन ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे.




