चिपळुणात दोन वाहन चालकांवर कारवाई


चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटातील पोलीस चेकपोस्टजवळील एका वळणावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करणार्‍या अरविंद जितन चौबे (५३, बिहार), अशोक कुमार रामअवतार वर्मा (५७, उत्तरप्रदेश) यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शैनेश बाळासो आडागळे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी वरील ठिकाणी इतर वाहनास अडथळा तसेच पादचार्‍यांच्या जीवितास धोका होईल अशा स्थितीत वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेली होती. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button