
भाताच्या रत्नागिरी-८ वाणाची चव महाराष्ट्रासह अन्य राज्यांना लागली.
कोकण कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या रत्नागिरीतील शिरगांव येथील भात संशोधन केंद्राने २०१९ साली रत्नागिरी-८ हे वाण विकसित केले. चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसात तयार होणार्या रत्नागिरी-८ (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य ६ राज्यांनाही लागली आहे. या वाणाच्या प्रचंड मागणीमुळे कोकण कृषी विद्यापीठाने यावर्षी गतवर्षीपेक्षा तिप्पट १९२ टन बियाणे वितरणासाठी तयार केले आहे.
कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगांव (ता. रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या वाणाने कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुुदुगं, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या चार वर्षात या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातूनही पसंती मिळत आहे. देशातील काही खाजगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने हे बियाणे तयार करून त्याची विक्रीही करत असल्याचे सांगितले आहे.www.konkantoday.com




