पाच कोटींच्या ’हाऊस बोटी’ प्रकल्प अडचणीत


केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतील निसर्गरम्य खाड्यांमध्ये महिला सक्षमीकरणाचा मोठा नारळ फुटला खरा, पण योग्य नियोजनाअभावी हा ५ कोटींचा महत्त्वाकांक्षी ’हाऊस बोट’ प्रकल्प सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. पर्यटकांनी याकडे पाठ फिरवल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनही दोन वर्षांत सर्व ५ बोटींमधून मिळून केवळ २१ लाख १ हजार ५२६ रुपयांचेच उत्पन्न प्रशासनाच्या पदरी पडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या तालुक्यांतील प्रभाग संघांना चालवण्यास दिलेल्या या आलिशान बोटी मुख्य पर्यटन केंद्रांपासून दूर आणि पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आल्याने ही समस्या ओढवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील १७ हजार ५९२ महिलांच्या सहभागातून ५ प्रभाग संघांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अत्यंत अलिशान हाऊस बोटी खरेदी करून देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला प्रसिद्धी कमी पडल्याचा अंदाज बांधून दुसर्‍या वर्षी जोरदार प्रचार-प्रसार करण्यात आला. तरीही पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला नाही. गावापासून दूर असलेली ठिकाणे, पर्यटकांच्या जेवणाची, मुक्कामाची व पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय यामुळे पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा देणे महिला बचत गटांना अशक्य ठरले.
एकट्या कोतवडे प्रभाग संघाने एकूण उत्पन्नाचा जवळपास ५० टक्के वाटा उचलला आहे. तर दापोलीच्या बुरोंडी आणि गुहागरच्या अंजनवेलमध्ये बोटीना पर्यटकांचा अजिबात प्रतिसाद मिळालेला नाही. १ कोटीची बोट देऊनही जिये जेमतेम ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तिथे महिला बचतगटांची देखभाल-दुरुस्तीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
दरम्यान, या स्थितीमुळे हा प्रकल्प वाचवण्यासाठी या बोटी पर्यटकांची वर्दळ असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी हलवणे अवित गरजेचे बनले आहे. त्यामुळे पालकमंधी उदय सामंत यांनी एवढा चांगला उपक्रम ज्याठिकाणी मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. पर्यटकाना जाणे-येणे सोपे होईल, अशा आहे. ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथे बोट टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button